लिहाव अस वाटणार आणखी एक पुस्तक जयवंत दळवी लिखित 'सारे प्रवासी घडीचे'.
कोकणातील वातावरणाच्या धर्तीवर सर्व लेखन आहे त्यामुळे कोकणी लोकांच्या मनाला हे जास्त भिडेल अस वाटत. साधी सरळ भाषा पण गुंतवून ठेवणार सादरीकरण . त्या प्रत्येक पात्राशी माझे पण बंध जोडले गेले. त्यांच्या आनंदात , दु:खात , रागात कधी समरसून गेले कळलच नाही.
वाचक कोकणी असो वा नसो पण हे पुस्तक वाचकाला Nostalgic
करून सोडेल आणि डोळ्यांच्या कडा ओलावेल एवढं मात्र नक्की.
No comments:
Post a Comment