Wednesday, January 2, 2013

नवीन वर्षाच्या शुभेच्छा

बघता बघता  २०१२ वर्ष संपल.

चांगल्या गोष्टी झाल्या नसत्या तरी चालल असत  पण दुर्दैवाने  या वर्षाला काही दुखद गोष्टीनीच  निरोप द्यावा लागतो आहे.  दिल्लीतील सामुहिक बलात्कार , आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचा अपघातात झालेला मृत्यू  मन हेलावून गेल्या.  परत ट्रेन , डीझेल , पेट्रोल , जागेच्या करात  झालेली वाढ  यांनी सामांन्याच्या  त्रासात  आणखीनच भर पडली आहे. 

याचा थोडा निचरा  व्हावा म्हणूनच कि काय वर्षाची सुरुवात गणपतीच्या अंगारखी ने झाली आहे . इतक्या वर्षांनी ती १जानेवारी ला यावी हा योगायोगच ... असो.

येणार वर्ष मात्र सर्वांना  निदान मुलभूत  सुरक्षिततेच (विशेषता स्त्रियांना ), मुलभूत   शारिरीक  आणि मानसिक स्वासथाच  , किमान महागाईच जावो  जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ....


1 comment:

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...