१३ दिवसाच्या लढाई नंतर शेवटी तिची प्राणज्योत मालवली.
तीच्या जगण्याच्या जिद्दीच कौतुक कराव तितक कमीच आहे, पण फक्त तेवढच पुरेस नाही या घटकेला. विचार व्हायला हव्हा आपल्या बिघडलेल्या मानसिकतेचा , कायद्याच्या कमकुवत पणाचा , राजकारण्यांच्या भ्रष्ट मानसिकतेचा आणि त्यावर कृती ची सर्वात जास्त गरज .
जेव्हा त्या नराधमाना त्यांच्याच भाषेत शिक्षा मिळेल तेव्हाच त्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, तिच्या कुटुंबियांना न्याय आणि आपल्या सगळ्यांना समाधान .
पण ही आहे एका लढाई ची सुरुवात जिच्या साठी आपण आता सज्ज राहायला हवे योग्य मानसिकता घेऊन आणि अशा चुकीच्या मानसिकतेला आणि कृत्यांना ठेचण्याची शस्त्र तयार ठेऊनच . ती अर्थातच कधी संपणार नाही कारण हिला आहे फार पूर्वा पार परंपरा, मानवी नैसर्गिक भावना , पण म्हणून स्त्री ने इतक असुरक्षित आयुष्य जगणे नक्कीच मान्य नाही .
मन सुन्न होऊन गेलय , मनात त्या नुसता बलात्कार नाही तर त्या क्रूर बलात्काराचा होणारा त्रास लवकर कमी होणार नाही.
टिपणी: घरा बाहेर नाही तर आजच्या घडिला मुली घरात पण सुरक्षित नाही ही आणखी लाजिरवाणी गोष्ट आहे.
No comments:
Post a Comment