आहाराचे आपल्या आयष्यात अनन्य साधारण महत्व आहे. ऐकून खूप होते पण खर पटल तेव्हा जेव्हा केस गळती वर डॉक्टरांनी मला पहिली औषध देण्या ऐवजी DIET वर लक्ष द्यायला सांगितले.
दिवसातून ८ ग्लास पाणी पिणे हेही तितकेच महत्वाचे. तेही शक्यतो जेवताना कमीच.
दिवसातून ८ ग्लास पाणी पिणे हेही तितकेच महत्वाचे. तेही शक्यतो जेवताना कमीच.
त्याला थोडी व्यायामाची जोड पण आवश्यक.
फक्त सौंदर्या साठीच नाही तर चांगली प्रतिकार शक्ती, मजबूत हाडे तसेच सर्व प्रकारचे आजार जास्तीत जास्त प्रमाणात दूर ठेवण्याचे काम उत्तम आहारातून होते. आजारी पडल्यास त्यातून लवकर बरे होण्यास नक्कीच मदत होते. याच महत्व तरुण पणात नाही पण म्हातार पणात नक्की जाणवेल.
१००% उत्तम आहार आणि तशी जीवन शैली पाळण आजच्या काळात जरा अशक्यच आहे, पण त्याच महत्व समजल तर १००% नाही पण ७०-८०% नक्कीच त्यात आपण यशस्वी होऊ शकतो. कारण वेळीच घातलेला एक टाका पुढचे दहा टाके वाचवतो.
आपले व. पु. पण म्हणतात कुठलाही प्रॉब्लेम वेळ , पैसा आणि माणस यांच्या पलीकडचा नसतोच.
No comments:
Post a Comment