गणपतीचे दिवस जवळ आले आहेत , पण तरीही ही पाककृती टाकत आहे . कारण घरचा LAPTOP बंद होता. आता संधी मिळाली . सुज्ञ वाचक समजून घेतील अशी खात्री आहे.
करायला सोप्पी आणि तितकीच चविष्ट
साहित्य :
तेल
जीरा
मोहरी
मसाला
बारीक चिरलेला कांदा,
बारीक चिरलेला टोमाटो
कडीपत्ता
किसलेले ओले खोबरे
बारीक चिरलेली कोथिंबीर
स्वच्छ केलेली कोलंबी
प्रथम तेलात जीरा , मोहरी कडीपत्ता यांची फोडणी द्यावी. नंतर टोमाटो परतावा . बारीक कांदा मउ होईपर्यंत परतावा. मसाला (मी आमचा मालवणी मसालाच वापरते )टाकावा. नंतर स्वच्छ केलेली कोलंबी टाकावी . थोडं पाणी घालून शिजू द्यावी .नंतर चवीनुसार मीठ टाकावे. किसलेले ओले खोबरे टाकावे. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर वरून शिवरावी .
गरम गरम तिखट वरण भाता बरोबर दोन घास जास्तच जातात .
he me 6 mahinya purvi try karun pahile hote.... Ekdam mast hote.... Hotel madhalyapeksha chavisht.
ReplyDeletePan me malavani masala vaparala navata.....
Malavani masalyachi paakkruti kalali asati tar far changale zale asate.... :)