पावसाळा आलाय. आता पावसाळी सहली ची मजा लुटायला, चटपटीत गरमागरम पदार्थांचा आस्वाद घ्यायला आपण सगळेच सज्ज होतो. नुसता गरमागरम चहा , चहा आणि गरमागरम भजी हा त्यातलेच स्वर्गीय आनंद देणारे मेनु. मुसळधार पडणारा पाऊस आणि चहा हे एक वेगळीच नशा चढवत .
पण कॉफी ????
तिची नशा मला चहा एवढी काही धुंद करणारी वाटत नहि. एक तर लहान पण पासून चहाशी असलेल एक नात. ते कॉफी
बरोबर काही जडल नहि. तिची जवळीक साधली ती ऑफिस च्या निमित्ताने . झोप उडवण्याची
ताकत तिची चहा पेक्षा जास्त पण
तरीही चहा तो चहा. चहा कोपर्यातल्या साध्या टपरी वर मिळतो , साध्या काचेच्या ग्लासातून, पेल्यातून पण चालतो, पिकनिक, ट्रेक ला बाहेर चहाच पसंत
केला जातो, त्याच्या जाहिराती पण सरळ साध्या , त्याच्या बरोबर हादडले जाणारे पदार्थ पण साधे आणि स्वस्त .
पण कॉफीचा साज जरा वेगळाच . तिच्या साठी खास CCD
, खास कपातूनच
तिची शान वाढते, तिच्या जाहिराती
पण जर उच्चभ्रू दर्जाच्या, त्याच्या बरोबर हादडले
(ते हादडले जात नाहीत तर
त्यांचा आस्वाद घेतला जातो. ) जाणारे पदार्थ
जरा वरचढीचे .
प्रत्येकीची आपली खासियत आहे. मी सकाळी चहा तर संध्याकाळी कॉफी (अर्थात ऑफिस
मध्ये )पसंत करते.
पण शेवटी हेच वाटत कि चहात जो आपले पण वाटतो तो कॉफीत वाटत नहि.
Ekdum khara!!
ReplyDelete:) :) me too luv tea but kadhi confuse hota between two. As u said zop ghalavanyachi coffee chi takad jast ahe.. nice one :)
ReplyDelete