लोकसत्ता मध्ये हल्ली नवीन सदर सुरु झाले " आठवणीतले फेरीवाले " ... ते वाचताना मन खूप ,खूप वर्ष मागे जात . चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी पण आणतात. लहानपणीच्या या फेरीवाल्या सारखे आणखी एक अविभाज्य घटक आहेत ती “आठवणीतील पुस्तक” जी अजूनही मी शक्य तशी वाचते. त्या नवीन कोऱ्या पुस्तकाचा वास तर मला जाम आवडतो.त्यातील ती आकर्षक , मजेशीर चित्र तर प्राण आणतात त्या पुस्तकांना.
ठकठक,(पण दुर्दैवाने ते पुस्तक आता बंद झाल आहे.), चांदोबा , चाचा चौधरी और साबू, ,नागराज ही पुस्तक तर मी चावून काढली आहे. ठकठक मधील दिपू,,, बन्या,, टीमू ही पात्र तर अविभाज्य घटकच बनून गेली आहेत. एका शब्द वरून चित्रातील १६ वस्तू शोधायच्या म्हणजे एकदम थ्रिलिंग .... चांदोबा पण मी अजूनही वाचते. त्यातली रेखीव चित्र मला प्रथम नजरेत भरायची. त्यातील गोष्टी तर भन्नाट.

चाचा चौधरी और साबू, नाव काढलं तरी हसायला येत चाचानी आपल्या अक्कल हुशारी ने व साबू ने आपल्या ताकती ने चोर दरोडेखोरांची जी पाचावर धारण बसवलेली बघून.
नागराज च्या कामगिरी तर अफलातूनच . मी ते पूर्ण वाचल्या शिवाय सोडताच नसे. अकबर बिरबलाच्या गोष्टी तर मी कदापि विसरू शकत नाही. बिरबलाने वेगवेगळ्या परिस्थितीत दाखवलेला हजरजबाबीपणा , अक्कल हुशारी मला नेहमीच थक्क करून सोडत असे.
खरंच ही पुस्तक आपल्या आयुष्याचा खजिना आहे. आपण आयुष्यात कितीही पुढे गेलो आणि आणि कितीही नवीन पुस्तक मिळाली तरी बालपणीच्या या पुस्तकांशी असलेली नाळ सुटण शक्य नाही ,किंबहुना आपण त्या शिवाय जगूच शकत नाही.त्यांच्या आठवणीनेच इतक मोहरून जायला होत की ते शब्दात सांगितलच जाऊ शकत नाही. हीच तर आपल्याला उर्जां देतात, आयुष्याचा खडतर प्रवास करायला,.
No comments:
Post a Comment