अरुणा शानबाग ... कुणाला याचं नाव व त्यांची बरोबर घडलेला आयुष्य हादरवून सोडणारा प्रसंग माहित नसेल असा कुणी सापडणं विरळाच .
यांच्या अनुषंगानेच उपस्थित झालेला दयामरणाचा प्रश्न...हाच विषय निट समजून घ्यावा म्हणून खास गुजारीश सिनेमा बघून काढला. ह्रितिक ने ही व्यक्तिरेखा उत्तम रित्या साकारली आहे आणि भंसाली यांनी पण नाण्याच्या दोन्ही आपापल्या पद्धतीने योग्य मांडल्या आहेत असं मला वाटत.
मृत्यू, मरण म्हटलं की सगळ्यांच्याच अंगावर काटा येतो. पण मला वाटतं दयामरण याचा जरा वेगळ्या अंगाने विचार व्हायला हवा. सरकार दयामरण नाकारत कारण प्रत्येकाला जगायचा हक्क आहे , सगलेजनच मग आपल्या दुर्धर व्याधीच कारण देऊन दयामरणाचा अर्ज करतील. ती बाजू पण पटते पण आपल्या व्याधीला कंटाळून लगेच मरणाला जवळ करणारी व्यक्ती आणि नियती ने घातलेल्या घावाला डगमगून न जाता वर्षानुवर्ष लढणारी , दुसर्यांसाठी आदर्श ठरलेली व्यक्ती यात जमीन आसमानाचा फरक आहे. चमत्काराने ती व्यक्ती बरी होऊ शकते पण आपण त्यावर इतकी वर्ष अवलंबून राहू शकत नाही. अशा आयुष्याशी लढणाऱ्या व्यक्तीने जर दयामरणाचा अर्ज दाखल केला तर त्याचा वेदनांचा आणि आजवर आयुष्याशी लढलेल्या युद्धाचा पण व्यावहारिक पातळी वर राहून विचार व्हायला हवा नाकी फक्त तात्विक पातळीवर.
एखादी बिछान्याला खिळलेली म्हातारी व्यक्ती (किंवा अगदी तरुणही ) लवकरात लवकर कमीत कमी त्रासात देवाघरी जावी अशीच तर आपणही इच्छा व्यक्त करतोच की. फक्त आपण त्यासाठी कोर्टात अर्ज दाखल करत नाही. पण भावना सारखीच.
हे सदर वाचणार्या प्रत्येकाला ही विनंती की त्यानी यावर नाण्याच्या दोन्ही बाजूंचा विचार करून मत नोंदवावे.
No comments:
Post a Comment