मराठी माणूस ...कालच्या घडीच्या श्री .बाळासाहेब ठाकरे ते आजच्या श्री. राज ठाकरे यांना या माणसासाठी झगडावे लागलेच . तेव्हा कुठे त्याला आपले हक्क मिळाले. आपल्याच राज्यात मिळणारी परक्यासारखी वागणूक थोडीफार कमी व्हायला मदत झाली. पण मला वाटत स्वतःची अशी अवस्था करून घेण्यात मराठी माणूस पण काही प्रमाणात तितकाच दोषी आहे. मराठी स्वाभिमानाच्या नावाखाली असणारी गुर्मी , अरेरावी वृत्ती सहन न करण्या सारखी तर आहेच पण तीच त्याच्या अधोगतीला पण कारणीभूत ठरते. मला स्वतःला मराठी असल्याचा अभिमान आहे पण म्हणून मी सगळ्यांना कमी लेखू लागले तर ते चुकीचंचआहे ना... मला मराठी माणसाचे असे खूप अनुभव आले आहेत की ज्या मूळे माझ त्याबद्दलच वरील मत हे अधिकाधिक पक्क होत गेलं.
मी आणि माझी मैत्रीण एकदा दादर ला खरेदीला गेलेलो. साडी घेण्यासाठी आम्ही हिंदमाता येथील एका दुकानात गेलो जे एका गुजराती माणसाचे होते. आम्हाला साड्या पसंद पडल्या पण बजेट नसल्याने म्हणून आम्ही बाहेर पडतच होतो पण त्याने आम्हाला म्हटले " नही लेना हो तो मत लो मगर देख तो लो , देखने के पैसे नही लगते" . आम्ही साड्या घेणार नाही याची खरी असूनही त्याने आम्हाला साड्या दाखवल्या .. आम्ही त्याची विनंती नाकारू शकलो नाही. वस्तू विकत घ्यावी म्हणून दुकानदार माल दाखवतात पण आम्ही वस्तू घेणार नाही याची खात्री असूनही(निदान आमच्या समोर तरी ) त्याने आम्हाला साड्या दाखवल्या. मी थोडीशी अचंभित झाले.

नंतर आम्ही स्टेशन जवळील एका सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानात गेलो(आपल्या मराठी माणसाच्या बर का ). माझ्या मैत्रीणीला एक हार आवडला. तिने तो त्याच्या कडे मागितला असता “घेणार असाल तरच दाखवेन” असा मराठी बाण्यात खडा सवाल पुसला. आम्ही जरा भाम्बवूनच त्याला हो असे म्हणता त्यांनी तो काढून दिला. तिने आरसा मागितला असता परत तोच प्रश्न नव्हे हुकुम सोडला "घ्यायचा असेल तरच बघा" . वस्तू विकत घेण्यासाठी जेवढी प्राथमिक तपासणी त्याची करावी तेवढीच केली (म्हणजे ती करायची पण आम्हाला मुभा दिली नाही आमच्या दुकानदार काकांनी).
पण एकाच वेळी दादर आलेले हे दोन अनुभव ....नकळत तुलना झाली दोघांची पण मनात ...
रिक्षावाला कोणी मराठी माणूस असला की पोटात गोळाच यायचा , आता सवय झाली आहे . नेहमीच्या स्टोप च्या अगोदरच सोडले तर काय बिशाद आहे आमची त्यांच्याशी वाद घालायची (अर्थात आम्ही भिक ना घालता थोडा तरी विरोध करतोच आणि तो अयशस्वीच होतो या उलट दुसरा कुणी असता तर त्याला थोडी विनवणी केली असता तो सोडेल ही स्टोप पर्यंत नाहीतर निदान गुर्मीत तरी बोलणार नाही, पण आपले मराठी बाणा जपणारे रिक्षावाले काका कुणाला ऐकतात की काय!!!)
असे आणखी मराठी माणसाचे खूप अनुभव आहेत.
श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस म्हणवणाऱ्या आपण लोकांनी त्यांच्या सर्व संकल्पनांचा विपर्यास करून टाकला आहे. गरज आहे त्याची शांत डोक्याने पुनर्विचार करायची .... जर आपल्याला आपले हक्क हवे असतील तर आपली कर्तव्ये पण सर्व प्रथम पूर्ण करावी लागतील . नुसती तलवार उचलून वाटेत येणाऱ्या वर ती उचलल्याने आपण मराठी म्हणवू शकत नाही , ती तलवार आपण का उचलली आहे आणि कोणावर उचलतोय हे जास्त महत्वाचे आहे.
राजकारणी आणि परप्रांतीय नक्कीच याला जवाबदार आहेत ,पण मराठी माणसाने पण जरा आपल्यात डोकावून बघण गरजेच आहे. दक्षिणात्य लोक जशी आपल्या भाषेशी , मातीशी आपली नाळ जोडून आहेत तसा प्रयत्न आपण सुद्धा केला पाहिजे. मग काय बिशाद आहे कुणाची जो मराठी माणसाला त्याच्या हक्कान पासून आणि प्रगती पासून दूर खेचण्याची आणि कोणत्याही नेत्याची गरज उरणार नाही मराठी माणसाला त्याच्या मुलभूत हक्कान साठी झगडण्यासाठी .....
No comments:
Post a Comment