Sunday, November 6, 2011

जून तेच सोनं


घरी  केबल घेऊन खूप वर्ष झाली . आता मी पुरती त्याच्या विळख्यात अडकले आहे आणि माझ्या सारखे आणखी अनेक जण. घरी आल्या आल्या एखादा music Channel , Catoon Channel  चाळवल्या शिवाय चैनच पडत नाही.

पण आता हळू हळू माझ्या या सवयीत फरक पडतोय, किंबहुना मी तो आणतेय. निमित्त मी आजारी पडल्याच. थोडी बरी झाल्यावर  विरंगुळा म्हणून मी दूरदर्शन संचाचा  आधार घेतला. पण सारखी केबल वाहिनी बघून मी कंटाळलेच , अक्षरशा वैतागले. कुठ्लालीही वाहिनी  फिरवा , जिकडे बघावं तिकडे भावनेचा उद्रेक दिसत असतो, कुठे प्रेम उतू जात असत , कुठे डोळ्यातील पाण्याला पूर आलेला असतो, कुठे कारस्थानी डोळे काहीतरी चाल आखत असतात , तर आणखी कुठे तेरी कुणी तरी कुणावर जळ फळत असत , . त्या गाण्याच्या  , नृत्याच्या स्पर्धांनी तर डोक उठत . DISCOVERY  वाहिनी पण सारखी बघून कंटाळा येतोच ना . (अर्थात याला काही अपवादात्मक कार्यक्रम पण आहेत, पण ते संखेने कमीच आहेत.) हॉटेल मधील चमचमीत जेवण जिभेला कितीही चांगलं लागलं तरी ते रोज खाण तब्येतीला चांगल तर नसतच आणि आपण पण वीटतोच  ना त्या जेवणाला , मग घरच्या साध्या वरण भाताची ओढ लागते , तशीच काहीशी अवस्था झाली माझी.
म्हणून मग मोर्चा वळवला आपल्या जुन्या सवंगड्या कडे , म्हटलं बघाव आजकाल दूरदर्शन , सह्याद्री वर काय चाललंय  ते


खरच वाटलं की  मी या सगळ्या पासून इतके दूर का गेले. मालगुडी डेज, मोगली, महाभारत, रामायण , पोटली बाबा की, अजनबी, जुनून, तेह्कीकात सर्कस, HEE MAN , निव , सुरभी,  बाल चित्रवाणी असेच खूप सारे  कार्यक्रम बघूनच तर मी वाढलेकेबल ने खरोखरच मला या सगळ्यान पासून चांगलंच तोडलं होत. पण परत त्या वाहिन्या कडे वळून खरच खूप चांगल वाटत होतते वेगवेगळे कार्यक्रम नुसती ज्ञान्यात  तर भर टाकतच नाही  , पण मनोरंजन पण करतात , अर्थात ते केबल वाहिन्या पेक्षा थोड कमीच असेल पण चालतदूरदर्शन वरील विविध कार्य क्रमाद्वारे आपल्या देशात कुठल्या कुठल्या योजना राबवल्या जात आहेत, आपल्या देशाची घटना काय सांगते याची बरच चांगली माहिती मिळते . एकंदर काय चालू आहे देशातील विविध भागात याची खोलवर माहिती मिळते. नुसती आपल्या देशाचीच नाही तर शेजारच्या देशात (पाकिस्तान सुद्धा बर  काकाय परिस्थिती आहे त्याची पण माहिती मिळतेजी केबल वरील इतर कुठल्या ही वाहिन्या देतात असं मला तरी वाटत नाही.   






सह्याद्री वरील कार्यक्रम पण महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात  काय चालले आहे याची बरीच माहिती देतातसरकार काय करत  आहे नेमकं निदान योजना तरी काय आहेत याची माहिती मिळते. विविध  कार्यक्रमा द्वारे राज्य आणि देशातील विविध रत्नांना ओळख मिळते.
 
खरच या वाहिन्या बघितल्या नंतर एक परिपूर्ण जेवणाची घरगुती थाळी जेवल्याचा आनंद मिळतो. जुन्या आठवणीना पण उजाळा मिळतो.
आता घरी आल्या आल्या मी रिमोट वरील आणि आकडेच दाबते , दूरदर्शन आणि सह्याद्री  वाहिनी साठीकेबल वाहिन्या चा  नंबर नंतर ...





http://youtu.be/jN6K4fiVuvk




जरूर बघा - http://ddnational.blogspot.com/

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...