Saturday, October 1, 2011

गणेशोत्सव आणि आपण ...गणेशोत्सव , माझ्या आणि तुमच्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा सण. गणपतीचे ते सुंदर रूप, तो फुलांचा सुगंध, त्याची आरास, उदबत्ती, धुपाचा तो दरवळलेला सुगंध , घरातल्या बायकांनी राबून केलेले ते गोड-धोड पदार्थ आणि गणपतीची ती सुमधुर गाणी .श्री. अजित कडकडे, श्री. सुरेश वाडकर , श्री. आनंद शिंदे यांच्या आर्त आवाजाने समृद्ध झालेली ती गाणी ऐकण्यात मन खरच तल्लीन होऊन जात.


पण सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थिती मात्र काहीशी बदलली दिसतेय. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने  या उत्सवाची मुहूर्त मेढ रोवली , तो उद्देश मात्र आजची स्थिती बघता सगळेच विसरून गेले आहेत असंच चित्र सगळीकडे दिसतंय आणि त्याची आता सगळ्यांनीच सवय करून घेतली  आहे ही आणखी दुर्दैवाची गोष्टगणेशोत्सवाच्या होत चाललेल्या या  ओंगळवाण्या रूपातील एक भाग म्हणजे ध्वनिक्षेपकावरून ऐकवली जाणारी गाणी. आवाजाची पातळी तर काही ठिकाणी त्यानी ओलांडलेली तर असतेच पण त्याही पेक्षा मला चीड येणारी गोष्ट वाटते ती म्हणजे हिंदी चित्रपटातील शृंगारिक, अश्लील गाण्यांच्या चाली वर रचलेली गणपतीची भक्ती पूर्ण गाणी .
कुठल्याही भक्ती रसातील गाण्याला जर अशा गाण्याच्या चाली दिल्या तर त्या गाण्याचा तर घोर अपमान तर होतोच , पण त्या गाण्या मुळे आपण ज्या भक्ती रसात बुडून जी मानसिक शांती मिळते ती पण आपण गमावून बसतो. त्या पवित्र वातावरणाचा  पुरा बट्ट्याबोळ होतो. हिंदी चित्रपटातील हिट ठरलेली हि गाणी मला पण आवडत असली , तरी ती आपल्या जागी आणि भक्तीभाव असलेली हि गाणी आपल्या जागी . त्यांची अशी गल्लत केलेली खरच सहन होत नाही.
खरच अशा प्रकारच्या गाण्यांना आपण सगळ्यानी विरोध करायलाच हवा तरच अशी गाणी वाजवणं आणि ती तशी बनवण्याची  प्रक्रिया थांबेल . गणेशोत्सवाच्या होत जाणाऱ्या ओंगळवाण्या रूपाला आपण काही अंशी तरी वाचवू शकू.
---------- कहर म्हणजे मी आळंदी सारख्या पवित्र ठिकाणी अशाच  एका  भक्तिपूर्ण गाण्याचे  हिंदी चित्रपटातील अशा गाण्याच्या चालीवरचे सूर कानी पडले ऐकून  सर्वप्रथम धक्काच बसला  की अशा ठिकाणी  हे गाणं वाजवलं जाऊ शकतं ते पण अशा गाण्याच्या चालीवर ..... तुम्ही कल्पना करू शकता ते कुठला गाणं असू शकत ज्याच्या चालीने विठू माउलीच  गुणगान सुरु होते ????
"भिगे होठ तेरे "

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...