टाकीचे घाव सोसल्या शिवाय देव पण येत नाही , हे शाळेत असताना नेहमीच ऐकत आले पण याचा अनुभव आजकाल चांगलाच यायला आहे.
सकाळी रोज ऑफिस मध्ये जाताना स्टेशन च्या बाहेर एक मुलगा गजरे विणताना आणि विकताना दिसतो. इतक्या हुशारीने आणि चपळते तो हे करत असतो की थक्क व्हायला होते. ट्रेन मध्ये पुस्तके , खेळणी विकणाऱ्या मुलांची चुणूक तितकीच भावते. पण त्यांच्या नशिबी पुस्तक वाचण नाही, खेळण्यान बरोबर खेळण नाही. हे विदारक सत्य तितकाच जाणवत. जीवाच्या आकांताने ओरडत माल विकताना त्यांना बघताना आपण पण क्षणभर थबकून जातो.या उलट थंडगार गाडीतून बाहेरच जग बघणारी मुलं मला नेहमीच केविलवाणी वाटतात. पिझा खात जगणाऱ्या या मुलात कसला तरतरीतपणा दिसतच नाही. खूपच आरामदायी आणि सर्व सुख सोयीनी युक्त जीवन जगताना त्यांच्यातले हे गुण विकसित व्हायचे राहूनच जातात.
मला वाटत अश्या मुलांच्या आई वडिलांनी त्यांच्या गाड्या कमी वापरून मुलांना जरा PUBLIC TRANSPORT मधली थोडी तरी गर्दी अनुभवायला द्यावी . मॉल मधील काही फेऱ्या कमी करून त्यांना जरा निसर्गा जवळ न्याव. बाहेर जेवायला गेल्यावर जरा पौष्टिक पदार्थांची पण ओळख करून द्यावी. आणि अर्थात आई वडिलांनी हे सगळं कृतीत आणल (निदान मुलां समोर तरी ) तर त्याचा मुलांवर लवकर आणि खोल परिणाम होईल.
स्वतः ला लेखिका मनात नसलात तरी चांगला लिहिताय. भेटत राहु . त्यातही तुम्हाला सामाजिक जाणीव आहे हे पाहून तुमच्याबद्दल आणखीनच आदर वाटू लागलाय
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद.. नक्कीच भेटत राहू..
ReplyDelete