Monday, July 11, 2011

रसिका.. तुला भावपूर्ण श्रद्धांजली

रसिका, कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीशी ७-८ वर्षे झगडून अखेर तू आमच्यातून गेलीस पण आम्हा रसिकांना  मात्र धक्कादायक मनस्थितीत ठेऊनच . जायचंच होतं इतक्या  लवकर तर का गुंतवल आम्हा रसिकांना स्वता  मध्ये इतकं?? असा राग  येतोय तुझा ....

दूरदर्शन वर कानांनी ही बातमी ऐकली ,  डोळ्यांनी तुझं अंतिम दर्शन घेतलं पण मन काही मान्य करत नाही, ते असंच वाट बघत राहील की तू दिसशील आम्हाला परत  नाटकं , मालिका , चित्रपटा  मधून आपल्या अभिनयाची मोहोर उमटवत ....

 हसा चकट  फू , प्रपंच  अशा  मालिका  तर मनात   घर  करून  राहिल्या  आहेत  आणि त्यातली तू , अप्रतिम ... आमच्यासारखीच वाटलीस तू आम्हाला . हिंदी चित्रपटा  मध्ये पण तू आपला अभिनय क्षमता सिद्ध  केलीस आपल्या उत्तम अभिनयाने आणि वैविध्य पूर्ण पात्रांनी. नाटका  विषयी तर बोलायलाच नको. तुझं कौतुक किती कराव तितकं थोडंच.

मन भरून आलंय , शब्द अपुरे  त्या सर्व भावना मांडायला पण,  एवढं मात्र नक्की एक जवळची मैत्रीण लळा लावून सोडून गेली , कायमची ....
तुझ्या आत्म्याला शांती मिळो हीच आम्हा रसिकांची ईश्वरचरणी प्रार्थना .....

1 comment:

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...