Sunday, December 30, 2012

काळा दिवस


१३ दिवसाच्या लढाई नंतर शेवटी तिची प्राणज्योत मालवली.




  तीच्या जगण्याच्या जिद्दीच कौतुक कराव तितक कमीच आहे, पण फक्त तेवढच पुरेस नाही या घटकेला. विचार व्हायला हव्हा आपल्या बिघडलेल्या मानसिकतेचा , कायद्याच्या कमकुवत पणाचा , राजकारण्यांच्या भ्रष्ट मानसिकतेचा  आणि त्यावर कृती ची सर्वात जास्त गरज . 

जेव्हा त्या नराधमाना त्यांच्याच भाषेत शिक्षा मिळेल तेव्हाच त्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, तिच्या कुटुंबियांना न्याय आणि आपल्या सगळ्यांना समाधान . 

पण ही आहे एका लढाई ची सुरुवात  जिच्या साठी आपण आता सज्ज राहायला हवे योग्य मानसिकता घेऊन आणि अशा चुकीच्या मानसिकतेला आणि कृत्यांना ठेचण्याची शस्त्र तयार ठेऊनच . ती अर्थातच कधी संपणार नाही कारण हिला आहे फार पूर्वा पार  परंपरा, मानवी नैसर्गिक भावना , पण म्हणून  स्त्री ने इतक असुरक्षित आयुष्य जगणे नक्कीच मान्य नाही .

मन सुन्न होऊन गेलय , मनात त्या नुसता बलात्कार नाही तर त्या क्रूर बलात्काराचा होणारा त्रास लवकर कमी होणार नाही. 

टिपणी: घरा बाहेर नाही तर आजच्या घडिला मुली घरात पण सुरक्षित नाही ही आणखी लाजिरवाणी गोष्ट आहे. 

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...