Saturday, February 11, 2012

इडली, ऑर्किड आणि मी ....

आपल्या वाचनात तसं बरंच काही येत पण लक्षात  काही ठराविकच  राहत किंबहुना  ठेवावसं वाटत. हल्लीच मी वाचलेलं पुस्तक म्हणजे श्री. विठ्ठल कामत लिखित इडली, ऑर्किड  आणि मी . अप्रतिम पुस्तक






आशिया खंडातील पहिला  ECO  FRIENDLY  HOTEL विठ्ठल कामत सरांनी बांधल म्हणून नाही तर त्यांनी ते ज्या परिस्थितीतून बांधल ते निव्वळ अचंभित करणार. पैसा जवळ असला की माणूस काहीही करू शकतो पण तो अचानक  हातातून निसटला की मग नंतर कस लागतो तो स्वतः गुणांचा , हिमतीचा आणि आतापर्यंत मिळवलेल्या GOODWILL चा . या पुस्तकात या सगळ्याचा अनुभव येतो.


सर्वात महत्वाचे म्हणजे विठ्ठल कामत सर हे आपल्यातील एक वाटतात नव्हे आहेत. त्यांचे अनुभव वाचताना वाटते कुठे तरी आपण पण यातून गेलो आहोत , जातोफरक असतो फक्त त्यावर दिलेल्या आपल्या आणि कामत सरांच्या प्रतिक्रियेत
फक्त वाचावे असे नाही तर संग्रही ठेवावे असे हे पुस्तक जे आपल्याला नेमीच आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर साथ देईल.



No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...