Sunday, March 20, 2011

ट्रेन मधील काही अनुभव


ट्रेन मधून प्रवास करताना आपण नेहमीच निरनिराळ्या विक्रेत्यांना बघतो. त्यात लहान मुलांचा पण समावेश असतो जे बघून जास्त वाईट वाटत. ज्याचं स्वताच  वय हे खेळण्याच , लिहिण्या वाचण्याच असत अशी मुलं खेळणी, पुस्तक विकताना दिसतात .  आपल्याला काही हवं असेल तर आपण त्यांना कशी हाक  मारतो ए ,जरा इधर आना, ए, शूक शूक...
मी अशीच एकदा प्रवास करताना असाच एक मुलगा चढला. एका बाईला त्याच्याकडील वस्तू बघायची होती. तिने त्याला हाक मारली ए छोटू  ,जरा इधर आना.... जशी आपण आपल्या घरातल्याच किंवा ओळखीच्या लहान मुलाला हाक मारतो ना तशी. तशी हाक एकूण मलाच क्षणभर इतकं भरून आलं कि वाटल आपल्याला कसा सुचल नाही हे . त्या बाई विषयी नकळत मनात आदर उत्पन्न झाला. मस्त jeans - T - shirt घातलेली पण अजिबात fashionable न वाटता , तितकीच चांगली पण वाटत होती.अशी हाक मी इतर कोणाच्या तोंडून ऐकली नव्हती , किंबहुना मी पण अशी हाक मारत नाही. त्यावेळी त्या मुलाच्या डोळ्यात पण असेच काहीसे आपुलकीचे भाव तरळून गेले.या मुलांना जगाच्या  आणि त्यांचा घरातल्यांच्या  पण त्रासाला तोंड द्यावे लागतेच. त्याना अशा वागणुकीची सवय झालेलीच असते पण तरीही थोडं त्याच्याशी माणूस म्हणून  वागलं की त्याच्या डोळ्यात आलेली ती हलवेपानाची  लकेर  मी बघितलीय .   त्या लहान मुलांना हिडीस फिडीस करण्या ऐवजी  अशीच हाक आपण त्यांना आपण मारली तर थोडी किंचीतशी  तरी आपण माणुसकीला जागू  असं वाटत. अर्थात ती कुठे चुकीची  वागताना दिसली तर त्याच पद्धतीने त्याना ओरडायचा हक्क न चुकवता ...
 तर सगळ काही चांगला मिळूनही बिघडलेली मुलं आपण बघतोच की ....

1 comment:

  1. jagamdhye sarvach lok vayeet nasatata.garaj aasate fakt samjun ghenyachi.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...