Monday, February 28, 2011

जाहिराती आणि आपण ....

जाहीरातींच आज आपल्या आयुष्यात आज एक वेगळा स्थान होऊन बसलं आहे. अर्थात ती कलाच तशी आहे, मानवी मनाचा  अचूक ठाव घेणारी... आणि त्यामुळेच त्या बनवताना तितकीच काळजी घेतली  जाते किंबहुना घ्यावी. 

मला भावणारी यातलीच एक जाहिरात आहे ती सर्फ ची...दाग अच्छे है.. ही जाहिरात बघून नक्कीच कधीही सर्फ न वापरणारी गृहिणी पण ती घेईल. चिखलाचे  डाग बहिणीच्या कपड्यांवर पडले म्हणून चिखला ला मारणारा भाऊ , आजी ला होणारा त्रास कमी व्हावा म्हणून स्वतहा  बुजगावणं होणारा नातू , मित्राना मार पडू नये म्हणून स्वताचा ड्रेस खराब करून घेणारा मित्र ही सगळीच पात्र मनात घर करून जातात , चांगल्या साठी पडलेले चिखलाचे डाग ( किंबहुना कुठलाही  त्रास )  त्रास दायक नसतातच , आणि थोडे फार झाले तर आम्ही आहोतच .....सर्फ

पण मनाला त्रासदायक ठरणारी जाहिरात आहे कोंडोम ची ..
दोन्ही  खेळाडू सर्व धोके पार करतात यशस्वी पद्धतीने पण एका स्त्री (मादक ) ला कोंडोम शिवाय ती सामोरे जात नाहीत, पण कोंडोम मिळाल्या वर मात्र ते निर्धास्त होतात. या वरून कोंडोम चे महत्वा पेक्षा पण जास्त प्रभावी संदेश कोणता वाटतो ?
एड्स विषयी जागृती आणि त्या पासून बचाव होण्यासाठीच्या जाहिराती सरळ  सांगतात  , कोंडोम वापरा आणि कितीही अनैतिक संबध ठेवा म्हणजे तुम्ही सर्व लैंगिक आजारांपासून , नको असलेल्या गर्भापासून मुक्त ( समाजात  तुम्ही उजळ माथ्याने फिरू शकता ). कोंडोम च्या महत्वा बरोबरच माणसाला जरा माणूस बनूनच जगायचा पण संदेश दिला तर कोंडोम चे अस हे महत्व पटवायची वेळ येणारच नाही ...

अशाच इतर ही खूप जाहिराती आहेत ज्या मनाला तर भावतातच पण त्या कल्पना  लढव्नार्यान च खर्च खूप कौतुक वाटत ..

पुढे वेळ मिळाला तर नक्कीच प्रयत्न करेन याविषयी लिहायचा ...

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...